विविध प्रलंबित मागणींचे अनुसरण..

  • 8:11 AM, 27 Jun, 2019

गेल्या अनेक वर्षांपासून शासन पातळीवर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका व गतप्रवर्तक संघटच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलन स्थळाला आज २० जून रोजी आमदार अँड यशोमती ठाकूर व आमदार विरेंद्र जगताप यांनी भेट दिली व त्याचा या मागण्या विधान सभागृहात मांडणार असल्याचे आश्वासन दिले.


राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत देशात सुमारे १० लाख आणि राज्यामध्ये ६० हजार आशा स्वयंसेविका व गतप्रवर्तक कार्यरत आहेत मात्र हे सर्व कर्मचारी तळागाळातील जनतेपर्यत आरोग्य सेवा पुरवितात परंतु आमच्या न्याय मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहेत. तर आशा स्वयंसेविका व गतप्रवर्तकांना अनुक्रमे १० हजार व ७ हजार इतके दरमहा मानधन देण्यात यावे १०० रुपये भत्ता देण्यात यावा १००० रुपये गणवेशाकरिता मिळावे व JIMM च्या ५०% रिक्त पदावर गतप्रवर्तकांची आणि ANM ५०% रिक्तपदावर आशा स्वयंसेविकाना वयाची अट शिथिल करून नियुक्ती देण्यात यावी अशा मागण्या संघटनेने केल्या आहे.

परंतु या मागण्यांकडे शासनाने पाठ केल्यामुळे संघटनेने हे बेमुदत धरणे आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे आज आमदार अँड यशोमती ठाकूर व विरेंद्र जगताप यांनी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या सोबत चर्चा केली व तुमच्या सर्व मागण्या रास्त आहे व हा मुद्दा सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात उपस्थित करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी धरणे आंदोलन करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गतप्रवर्तक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले


SHARE THIS NEWS ON:


शोध बातम्या

ताजी बातमी
विविध प्रलंबित मागणींचे अनुसरण..
27/06/2019

गेल्या अनेक वर्षांपासून शासन पातळीवर प्रलंबित असलेल्या...

शोध