तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे लवकरच लोकार्पण होणार; आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश

  • 12:58 PM, 28 Jun, 2019

तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे लवकरच लोकार्पण होणार; आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश. सध्या स्थित असलेल्या तिवसा ग्रामीण रुग्णालयाची इमारत मोडकळीस आल्याने मोझरी विकास आराखड्यातुन सातरगाव रोडवर नव्याने रुग्णालय बांधण्यात आले. सुसज्ज अशी इमारत बांधण्यात आली मात्र याचे लोकार्पण बऱ्याच दिवसापासून रखडले होते. त्यामुळे आता या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी येत्या गुरुवारी विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री यांच्या सोबत बैठक होणार आहे. त्यानंतर लवकर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या नवीन इमारतीचे लोकार्पण होणार आहे.

आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या अथक परिश्रमातुन तिवसा ग्रामीण रुग्णालयाला आता उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणार व नवीन इमारतीत तिवसा ग्रामीण रुग्णालयात आता स्थलांतरीत होणार आहे.


SHARE THIS NEWS ON:


शोध बातम्या

ताजी बातमी
विविध प्रलंबित मागणींचे अनुसरण..
27/06/2019

गेल्या अनेक वर्षांपासून शासन पातळीवर प्रलंबित असलेल्या...

शोध